महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारू तस्करी करणारे ११ जण गजाआड, साडे तीन लाखाची गावठी दारू जप्त

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही तळीरामांचा गळा ओला करण्यासाठी दारू तस्करी सुरू आहे. कोरोनामुळे आता दारू तस्करी बंद आहे. परिणामी मिळेल त्या ब्रँन्डने तळीराम तहान भागवित आहेत. त्यामुळे गावठी दारूची मागणी वाढली असून विरुर, सुबई, मुंडीगेट या गाव परिसरात गावठी दारु मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची चर्चा आहे.

11 दारु तस्कर पोलीसांच्या ताब्यात
11 दारु तस्कर पोलीसांच्या ताब्यात

By

Published : Apr 6, 2020, 2:47 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यातील विरुर पोलिसांनी धडक मोहीम राबवित दुसऱ्या दिवशीही गावठी दारूची तस्करी करणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींकडून एकूण 3 लाख 20 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरानाचा पार्श्वभूमीवर तळीरामांची तहान भागविण्यासाठी गावठी दारुची तस्करी जोरात सुरू आहे. अशातच पोलीसांच्या कार्यवाहींने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही तळीरामांचा गळा ओला करण्यासाठी येथे देशी-विदेशी दारूची चोर मार्गाने आयात सुरू होती. तर, कोरोनामुळे आता दारू तस्करी बंद आहे. परिणामी मिळेल त्या ब्रँन्डने तळीराम तहान भागवित आहेत. त्यामुळे गावठी दारूची मागणी वाढली असून विरुर, सुबई, मुंडीगेट या गाव परिसरात गावठी दारु मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची चर्चा आहे.

काही तस्करांनी या गावाकडे मोर्चा वळविल्याची माहिती विरुर पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी आणि उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी धाडसत्र राबविले. या कारवाईत अकरा दारू तस्कर पोलीसांच्या हाती लागले आहेत.

रविवारी टाकलेल्या छाप्यात विरुर पोलीसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले होते, आणि त्यांच्याकडून 2 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर, आज (सोमवार) झालेल्या दुसऱ्या कार्यवाहीत ११ दारू तस्करांसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्या आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details