महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्याहून चंद्रपुरात आलेले तब्बल 1085 प्रवाशी 'होम क्वारंटाईन'... - कोरोना व्हायरस बातमी

चंद्रपूर रेल्वे स्थानकावर दुपारी 2 वाजता पुण्याहून आलेली पुणे-काझीपेठ या रेल्वेने मोठ्या संख्येने पुण्याहून प्रवासी चंद्रपूरला आले. त्या सर्व प्रवाशांची सविस्तर माहिती घेऊन, थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

1085-travelers-home-quarantine-in-chandrapur
पुण्याहून चंद्रपुरात आलेले तब्बल 1085 प्रवाशी 'होम क्वारंटाईन'...

By

Published : Mar 21, 2020, 9:06 PM IST

चंद्रपूर- जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. शनिवारी पुण्यावरून विशेष रेल्वेने आलेल्या 1 हजार 85 प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर येथील 765 तर बल्लारपूर येथील 320 प्रवाशांचा समावेश आहे. या सर्व प्रवाशांनी पुढील 14 दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्का मारलेली व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

पुण्याहून चंद्रपुरात आलेले तब्बल 1085 प्रवाशी 'होम क्वारंटाईन'...

हेही वाचा-दिवसभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडींचा वेगवान आढावा...

चंद्रपूर रेल्वे स्थानकावर दुपारी 2 वाजता पुण्याहून आलेली पुणे-काझीपेठ या रेल्वेने मोठ्या संख्येने पुण्याहून प्रवासी चंद्रपूरला आले. त्या सर्व प्रवाशांची सविस्तर माहिती घेऊन, थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच पुण्याहून चंद्रपूरकडे येणाऱ्या सर्व रेल्वेतील प्रवाशांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या तपासणीसाठी बल्लारपूर येथे स्वतः जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, यांच्यासह बल्लारपूर नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

अशी झाली तपासणी-
प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले. नंतर त्यांची थर्मल स्क्रीनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. नंतरच त्यांना रेल्वे स्थानकांवरुन घरी पाठविण्यात आले. या प्रक्रियेमध्ये रेल्वे स्थानकावर एकूण 10 नोंदणी कक्ष, 5 थर्मल स्क्रीनिंग कक्ष व 1 होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी कक्ष उभारण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details