चंद्रपूर - जिल्ह्यात मागील २४ तासात ४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर १०४ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ८५७ कोरोनाच्या रुग्णांची संख्या पोहोचली आहे.
जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ६६० वर पोहोचली आहे. तसेच बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. सध्या ८५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ३० हजार २७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख तीन हजार ४४८ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ४०२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.