चिमूर(चंद्रपूर)-चिमूर पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पळसगाव पिपर्डा परिसरात १ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा अवैध दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे. वहानगाव येथे चारचाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. मात्र कारवाईचा सुगावा संशयित वाहन चालकाला लागताच त्याने दारू साठा टाकत पळ काढला. याप्रकरणी पुढील तपास चिमूर पोलीस करत आहे.
चिमूरमध्ये १ लाख ४६ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु आहे. अशात पोलिसांकडूनही कारवाई करण्यात येत आहे. चिमुर तालुक्यातील पळसगांव पिपर्डा परिसरात पोलिसांनी धाड टाकत १ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे.
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु आहे. अशात पोलिसांकडूनही कारवाई करण्यात येत आहे. चिमुर तालुक्यातील पळसगांव पिपर्डा परिसरात पोलीसांनी छापा टाकत १ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांंना घटनास्थळी ९ देशी दारुने भरलेल्या पेट्या आढळल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या दारुची एकूण किंमत १,४६,४०० रुपये असल्याची माहीती आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
हेही वाचा-87 घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास बेड्या; 20 तोळे सोने जप्त