मुंबई- वाडीबंदर रेल्वे यार्ड, गेट नंबर ११ च्या आतील बाजूच्या गेटजवळ ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर अज्ञातांनी सिमेंटचा ब्लॉक मारुन हत्या केली होती. २५ मार्च रोजी ही घटना घडली होती. डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली होती. तर, दुसऱ्या आरोपीला पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे.
वाडीबंदर रेल्वे यार्डाजवळ झालेल्या हत्येप्रकरणी २ आरोपींना अटक - रेल्वे
घटनेच्या दिवशी मृत अब्दुल आणि २ आरोपीत भांडण झाले होते. या दरम्यान अब्दुल यास आरोपी शिवानंद व राजा यांनी मारहाण केली आणि डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली.
डोंगरी पोलिसांना तपासामध्ये अनोळखी व्यक्तीचे नाव अब्दुल रेहमान (मुळ गांव, त्रिवेंद्रम, केरळ) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावर तपासलेले साक्षीदार आणि बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मृत अब्दुल रहेमान याची हत्या त्याचा मित्र शिवानंद बसवराज कटनळळी ऊर्फ शिवा ऊर्फ राजू (वय ३५ वर्षे) आणि राजा यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेच्या दिवशी मृत अब्दुल आणि २ आरोपीत भांडण झाले होते. या दरम्यान अब्दुल यास आरोपी शिवानंद व राजा यांनी मारहाण केली आणि डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी शिवानंद बसवराज कटनळळी ऊर्फ शिवा ऊर्फ राजु यास चांभार गोदी येथील नारंगी गेटच्या कंपाउंडजवळ सापळा रचून अटक केली. तर, दुसरा आरोपी राजा यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.