मुंबई- गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून केईएम रुग्णालयाची ओळख आहे. येथील रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची हेळसांड होऊ नये, यासाठी उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्यावतीने मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आले.
केईएममध्ये रुग्णाच्या नातेवाईकांसाठी उन्नती फाउंडेशनकडून अल्पोपहार वाटप
मुंबईतल्या केईएम रुग्णालय हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो गरीब रुग्णांसाठी जीवनदायी आहे. परंतु, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी हेळसांड होते. यासाठी उन्नती समाजसेवा फाऊंडेशनने अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू केला.
उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोटभर अन्न मिळत असल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. मुंबईतल्या केईएम रुग्णालय हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो गरीब रुग्णांसाठी जीवनदायी आहे. इथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी हेळसांड होते. शिवाय, दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईमुळे त्यांना जेवण मिळणेही कठीण होते. काही रुग्णांच्या नातेवाईकांना तर अर्धपोटी राहून दिवस काढावे लागतात. यासाठी उन्नती समाजसेवा फाऊंडेशनने अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू केला. सकाळी ६ वाजून ३० मिनिटाला सुरू झालेल्या उपक्रमाचा तब्बल ४०० लोकांनी लाभ घेतला.
उन्नतीच्या अन्नदानाच्या उपक्रमामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष शिरीष पारीख, अमोल पवार, रुपेश मोरे, सुनील पुजारी, जगदिश नलावडे, नूतन बाबदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील बनकर आणि सहकारी यांनी भाग घेतला होता.