महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्ही काय केले ते आधी आरशामध्ये बघा; मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? - उद्धव ठाकरे - काँग्रेस

मागच्यावेळी यांचे सरकार असताना यांनी शेण घोटाळा केला होता. हे काहीच सोडत नाहीत. आता कोणता घोटाळा करायचा राहिला आहे, ह्यांनाच माहित. लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, असेही उद्धव म्हणाले.

उद्धव ठाकरेंची मुंबई सभा

By

Published : Apr 17, 2019, 9:30 AM IST

मुंबई- आघाडीच्या काळात आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, शेण घोटाळा आणि बोफोर्स घोटाळे झाले. शरद पवार आणि राहुल गांधी आधी तुमची चौकशी होवू द्या. आधी तुम्ही आरशामध्ये बघा, तुम्ही काय केले ते, मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. मुंबई येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंची मुंबई सभेतील भाषण

देशात पहिल्यांदा काँग्रेसेत्तर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते. ते यांनी १३ दिवसातच काढून टाकले. यांना दुसरे कोणी सत्तेत आलेले चालत नाही. सत्ता तुम्हालाच हवी आहे. सत्तेची हाव तुम्हालाच आहे. सोनिया गांधीना पंतप्रधानासाठी विरोध करणारे शरद पवार पुन्हा वाडग घेवून सत्तेसाठी त्यांच्या मागे गेले. मनमोहनसिंग सरकारच्या काळात जेवढे घोटाळे झालेत तेवढेच घोटाळे काढा, आणि मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? आघाडी म्हणजे भोक पडलेला फुगा. ज्या फुग्याला कुठला आकारच नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर केली.

सध्या शेतकऱ्यांसोबत शरद पवार भेट घेत आहेत. त्यांचे शेतकऱ्यांसोबत फोटो आहेत. आत्ता शरद पवारांना साक्षात्कार झाला की या देशात शेतकरी आहे आणि दुष्काळग्रस्त आहे. याआधी फक्त क्रिकेटरसोबतच त्यांचे फोटो होते. ज्या शेतकऱ्यांची चौकशी शरद पवार यांनी केली ते शेतकरी धास्तावले आहेत. मागच्यावेळी यांचे सरकार असताना यांनी शेण घोटाळा केला होता. हे काहीच सोडत नाहीत. आता कोणता घोटाळा करायचा राहिला आहे, ह्यांनाच माहित. लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही. कारण, आम्ही शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहोत, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details