मुंबई- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी गांधी नगर, मुंबई येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि पुनम महाजन यांनीही मतदान केले. पुनम महाजन उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून महायुतीच्या भाजप उमेदवार आहेत. त्यांनीही ठाकरे परिवारासोबत मतदानाचा हक्क बजावला.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचे कुटूंबासह गांधी नगर येथे मतदान - mumbai
महायुतीच्या उमेदवार पुनम महाजन समोर महाआघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचे तगडे आवाहन आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे.
उद्धव ठाकरेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
महायुतीच्या उमेदवार पुनम महाजन समोर महाआघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचे तगडे आवाहन आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे. महाराष्ट्रात आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. मुंबईत अनेक दिग्गजांबरोबर पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक नेतेमंडळी मतदान करत आहेत. याबरोबरच मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन देखील करत आहेत.