महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हाडाच्या २१७ घरांची लॉटरी जाहीर; 23 वर्षानंतर झाले गणेश खैरनार यांचे स्वप्न पुर्ण - form

म्हाडाच्या मुंबईतील 217 घरांची सोडत जाहीर झाली. 66 हजार 500 अर्ज यावेळी दाखल झाले होते. या अर्जाच्या गर्दीत म्हाडाच्या दोन कर्मचाऱ्यांना सहकार नगर येथे घराची लॉटरी लागली. म्हाडा कर्मचारी गणेश खैरनार आणि प्रशांत गायकवाड हे या सोडतीचे सर्वसाधारण गटातून विजेते ठरले आहेत.

गणेश खैरनार आणि प्रशांत गायकवाड यांचे स्वप्न पुर्ण

By

Published : Jun 3, 2019, 10:31 AM IST

मुंबई- हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचसाठी अनेकजण जिवाचा आटापिटा करत असतात. म्हाडाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील घरांसाठी लॉटरी आणली होती. निवडणुकीमुळे ही सोडत तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. निवडणूक संपल्याने आता ही सोडत जाहीर करण्यात आली. यात म्हाडा कर्मचारी गणेश खैरनार आणि प्रशांत गायकवाड हे या सोडतीचे सर्वसाधारण गटातून विजेते ठरले आहेत.


म्हाडाच्या मुंबईतील 217 घरांची सोडत जाहीर झाली. या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला 66 हजार 500 अर्ज यावेळी दाखल झाले होते. या अर्जाच्या गर्दीत म्हाडाच्या दोन कर्मचाऱ्यांना सहकार नगर येथे घराची लॉटरी लागली. म्हाडा कर्मचारी गणेश खैरनार आणि प्रशांत गायकवाड हे या सोडतीचे सर्वसाधारण गटातून विजेते ठरले आहेत.
म्हाडा कर्मचारी गणेश खैरनार गेल्या 23 वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी प्रतीक्षा करत होते. कुर्ला येथे भाड्याने राहणारे खैरनार हे आता स्वतःच्या हक्काच्या घरात जाणार आहे. त्याचप्रकारे प्रशांत गायकवाड हे देखील गेल्या 5 वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत आहेत. मात्र त्यांना या वर्षी यश मिळाले आहे.


घर कमी आहेत. हे सत्य आहे, पण लोकांनी प्रयत्न करावा, हार मानू नये, असे खैरनार यांनी सांगितले. तर हक्काच्या घरात कुटुंबालाही मुंबईत घेऊन येईन, असे प्रशांत गायकवाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details