मुंबई- डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
डोंगरी दुर्घटना: जेजे रुग्णालयातून थेट परिस्थितीचा आढावा... - dongri
डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली आहे. यात जखमी झालेल्यांना 7 जणांना जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयातून इटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी परिस्थितीचा आढावा घेतला.
डोंगरी दुर्घटना
दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जे. जे. रुग्णालयातून इटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.