राजाभाऊ ढाले यांचे कार्य आम्ही पुढे घेऊन जाऊ... - जोपासलेला वारसा
राजाभाऊंनी जोपासलेला वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. त्यांचे साहित्य यासाठी आम्हाला मार्गदर्शन करेल. असे गाथा ढाले म्हणाल्या आहेत.
मुंबई-दलित पँथर चळवळीचे संस्थापक राजाभाऊ ढाले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्याच्या अश्या अचानक झालेल्या निधनामुळे चळवळीवर आणि आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजाभाऊंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ एका पँथरला मुकली आहे. राजाभाऊंनी जोपासलेला वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. त्यांचे साहित्य यासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करेल. त्याच्या पार्थीवावर बुधवारी दुपारी १ वाजता, दादर येथील चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती राजाभाऊ ढाले यांची मुलगी गाथा ढाले यांनी दिली.