मुंबई- काँग्रेसचे दिवंगत नेते आणि चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांनी आज प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार आहेत.
सिद्धीविनायकाचे दर्शन घेत प्रिया दत्त यांनी भरला उमेदवारी अर्ज
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात असलेल्या देवी-देवतांचे दर्शन घेऊन स्थानिकांचेही आशीर्वाद घेतले. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.
प्रिया दत्त यांनी सकाळी आई-वडिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही त्यांनी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमी येथे अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात असलेल्या देवी-देवतांचे दर्शन घेऊन स्थानिकांचेही आशीर्वाद घेतले. यासोबतच मतदारसंघातील विविध धर्मीय धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. बाबा मगदूम शहा दर्ग्यात चादर चढवून अनेक मुल्ला मौलवी यांचेही आशीर्वाद घेतले. त्यांनी माउंट मेरी चर्चला जाऊन प्रभू येशू आणि मरियम यांच्यापुढे प्रार्थना केली. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.