महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसला गरिबांच्या नावाने राजकारण करण्यात पीएचडी दिली पाहिजे - पंकजा मुंडे - Ramdas Athavale

काँग्रेसचा हात गरीबों के साथ होता, मग गरिबी का संपली नाही. गरिबी वाढली का, याचे उत्तर कोण देणार, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे

By

Published : Apr 26, 2019, 9:05 PM IST

मुंबई - गरिबांचे नाव काँग्रेसने अनेक वर्षे घेतले. जर गरिबांच्या नावाने राजकारण करण्यात कुणाला पीएचडी द्याची असेल तर ती काँग्रेसला दिली पाहिजे. त्यांनी काँग्रेसचा हात गरिबो के साथ, अशी घोषणा अनेक वर्षे दिली. कॉग्रेसचा हात गरिबोके साथ होता मग गरिबी का संपली नाही. गरिबी वाढली का, याचे उत्तर कोण देणार, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी मला मंत्री म्हणून बोलावण्यापेक्षा गरिबोकी नेता म्हणून बोलावलं याचा खूप आनंद वाटला, असेही मुंडे म्हणाल्या. ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

घाटकोपर पंतनगर येथील सहकार मार्केटमध्ये संपन्न झालेल्या प्रचार सभेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री महादेव जाणकर, किरीट सोमय्या तसेच शिवसेना भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना, यांचे पणजोबा, आजी प्रधानमंत्री होते. त्याच्या आईच्या हातात सर्व प्रधानमंत्र्यांचे रिमोट कंट्रोल होते, तरी या लोकांना आमच्यासाठी साधे शौचालय बांधता आले नाही. महिलेला चुलीपासून मुक्त करून गॅससमोर बसवता आले नाही, गरीबाच्या घरामध्ये साधा एक दिवा लावता आला नाही, गरिबाला रुग्णालयात लागणाऱ्या रांगेपासून मुक्त करता आले नाही, ते लोक देशाच्या नागरिकांना काय म्हणून स्वप्न दाखवणार, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी केला.

अब कि बार मोदी सरकार, आता घोषणा दिली आहे, फिर एक बार मोदी सरकार आणि यापुढे आम्ही असे काही काम करू की बार बार मोदी सरकार, अशी घोषणा देऊ. आमच्याकडे घोषणा तरी आहेत, विरोधकांकडे कुठलीच घोषणा नाही. सापा-मुंगुसाचे वैर असलेले एकत्र आलेले आहेत, जे एकमेकांचे तोंड स्वप्नातही बघत नाहीत, असे सर्व एकत्र आले आहेत. याचा नेता कोण आहे, यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे, असे प्रश्न पंकजांनी उपस्थित केले. यावेळी असा उमेदवार जाहीर करण्याची वेळ आली तर यांच्यामध्ये महायुद्ध होईल, असा टोला पंकजा मुंडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला लगावला.

झोपडपट्टीला कटऑफ डेट नको - रामदास आठवले


मै आया हू यहा ये बताने के लिए , मै जा राहा हु मुलुंड कोटक को जिताने के लिए,
मै घाटकोपर मे यहा आया हू आप सभी को मनाने के लिये,

मै दिल्ली जा रहा हु मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए
मै घाटकोपर मे आया हू प्रका,श मेहता के साथ दोस्ती कराने के लिए,

मै घूम रहा हु राहुल गांधी को हराने के लिए...

नरेंद मोदी नाही बोलत खोटे,
मात्र त्यांच्या विरोधात बरेच जण बोलतात खोटे,
पण आम्ही बांधणार आहोत मनोज कोटक यांना विजयाचे फेटे

या कवितेसह आपले भाषण सुरू करणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठवाडा विद्यापीठासाठी १४ वर्षे आंदोलन करावे लागले. त्या आंदोलनात आमच्या सोबत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे तुरुंगात होते. यामुळे भाजप या आंदोलनात आमच्या सोबत राहिला आहे. आज अमित शाहंपासून अनेक जण राज्यसभेतून लोकसभेत जात आहेत. म्हणून किरीट सोमय्या यांचे नाव कट झाल्यावर मी ईशान्य मुंबईमधून आपल्याला उमेदवारी मिळावी, म्हणून सेटिंग लावत होतो. मी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नव्हतो, यामुळे कोटक यांना उमेदवारी मिळाली असल्याने आता त्यांना दिल्लीमध्ये पाठवावे, असे आवाहन आठवले यांनी केले. यावेळी झोपडपट्टीला १९९५ नंतर २०११ ची कटऑफ डेट ठेवण्यात आली. अशी कटऑफ डेट झोपडपट्टीला असता कामा नये, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details