मुंबई - मतदान करण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करतात. मात्र काही जण अत्यंत् विपरित परिस्थितीतही मतदान करण्यासाठी उत्सुक असतात. जागतिक हेमोफेलिया दिवस साजरा करण्यासाठी आलेल्या केईएममधील रुग्णांनी उपचार घेऊन मतदान करण्याचा निश्चय केला. विशेष म्हणजे या आजारात रुग्णांची हाडे निकामी होतात. तरीही त्यांनी मतदानाविषयी जागरुकता दाखवून मतदान करण्याचा समाजाला संदेश दिला आहे.
राज्यभरात ३ हजारांहून अधिक हेमोफेलियाचे रुग्ण आहेत. केईएम रुग्णालयातील डॉक्टर व हेमोफेलीया रुग्ण व त्यांच्यासाठी हेमोफेलीया सोसायटी काम करते. या सोसायटीकडून आज जागतिक हेमोफेलीया दिवस केईएममध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात हेमोफेलीया रुग्णांनी हेमोफेलीया आजाराविषयी जनजागृती केली. तसेच मतदान करण्याचे आवाहन केले.
या रोगाविषयी चांगल्या प्रमाणात जनजागृती करून सरकारने लक्ष द्यावे, अशी रुग्ण व डॉक्टरांनी अपेक्षा व्यक्त केली. औषध उपचारपद्धतीत अनुदान दिले पाहिजे, अशीही रुग्णांनी अपेक्षा व्यक्त केली.
काय आहे हेमोफेलिया आजार
या आजाराबद्दल महाराष्ट्रात चांगली उपचारपद्धती आहे. परंतु हा रोग पूर्णपणे बरा होत नाही. या रोगात रक्तातील पेशी मृत होतात. त्यामुळे एखाद्याला काही जखम झाली तर सारखा रक्तस्त्राव होतो. तो बरा होत नाही. त्यामुळे हाड निकामी होतात. मग रोगी जागेवरून हलू शकत नाही. अशा अनेक रुग्णांना कित्येक वर्षांपासून मतदानाला जाता आले नाही. तरीही त्यांनी यावेळी मतदान करणार, असा निश्चय बोलून दाखविला आहे.
हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. यात रुग्णाच्या शरिरात रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. शरीराला इजा झाल्यास, रक्तस्त्राव थांबत नाही. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यास शरीराला सूज येते. विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊन कायमचे अपंगत्व येते. मुंबईत या रोगाचे ८०० रुग्ण आहेत. याशिवाय २० हजारांची लस ही प्रत्येकाला परवडणारी नाही. त्यामुळे निधी परत पाठवण्याची घाई करण्यापेक्षा तो गरजूंसाठी वापरण्याची तत्परता सरकारने दाखवावी, अशी अपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.