मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेत गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा करुन दिला. "खेळीमेळीच्या वातावरणात या सभागृहाचे कामकाज चालावे, नीलम गोऱ्हे यांच्यामुळे सभागृहाला फुले-आंबेडकरी चेहरा मिळाला म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेत आहे," असे मत जोगेंद्र कवाडे यांन यावेळी व्यक्त केले.
सभागृह नेते यांनी उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहात नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महिला म्हणून उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे.