महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक २०१९: नव मतदारांच्या मनात दडलंय काय? - नवीन मतदार

नवीन मतदाराच्या मनात काय आहे? त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारतने त्यांच्याशी केलेली खास बातचीत.

नवीन मतदार

By

Published : Apr 1, 2019, 11:25 AM IST

मुंबई- लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर नवीन मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी नवीन मतदाराच्या मनात काय आहे? त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारतने त्यांच्याशी केलेली खास बातचीत

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ही मोठी आहे. तरुणांच्या मते निवडणुका येतात तेंव्हा प्रत्येक राजकीय पक्ष घोषणा करतात. त्या पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच यावेळी मुख्य मुद्दा आरक्षण असणार आहे. काही तरुणींच्या मते, आरक्षण हे रद्द झाले पाहिजे. आम्हाला आरक्षणाची काही अडचण नाही आहे. पण जातीय नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे. मुंबईत सध्या मैदानांची संख्या घटत आहे. ती वाढवली पाहिजे.

काही नवीन मतदार म्हणाले, पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे खूप उत्सुकता आहे. मी उमेदवाराचे प्रोफाइल व त्याची समाजासाठी काम करण्याची क्षमता पाहूनच मतदान करणार आहे. मी उमेदवारांची तरुणांसाठी काम करण्याची क्षमता पाहून निवड करणार आहे, असेही मत काही नवीन मतदारांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details