मुंबई- मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी दादरमधील नक्षत्र मॉल येथे फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांनी नृत्याच्या माध्यमातून मतदानाबद्दल जनजागृती केली. मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मतदार जनजागृतीसाठी मुंबईत फ्लॅश मॉबचे आयोजन - मुंबई
लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. पृथ्वी इनोव्हेशन ग्रुपचे २५ तरुण-तरुणी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. मुंबईत ६ लोकसभेच्या जागा आहेत. २४ लाख ५७ हजार ०२६ पात्र मतदार आहेत. मुंबईत २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येणार आहे. दादरपासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
पृथ्वी इनोव्हेशन ग्रुपचे २५ तरुण-तरुणी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणार आहेत. २८ एप्रिल पर्यंत मुंबई शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येणार आहे.