मुंबई- ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने प्रकल्प सुरू केले आहेत. त्याअंतर्गत विविध शासकीय इमारतींवर हरित ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या वीज बिलात महिन्याला ३० ते ३२ हजार रुपयांची बचत होत आहे.
सोलारच्या माध्यमातून एसटी महामंडाळाची उर्जाबचत - मुंबई
मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या वीज बिलात महिन्याला ३० ते ३२ हजार रुपयांची बचत होत आहे.
एसटी महामंडळ मुख्यालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसाला १५० युनिट वीज मिळते. या प्रकल्पासाठी शासनाकडून ५० टक्के सबसिडी महामंडळाला मिळाली आहे. सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सेकी) एमएनआरइ अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येतोय. प्रत्येक राज्यासाठी अशा तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पाच उद्घाटन १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आले आहे. यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर एसटी मुख्यालय इमारत व परिसरातील ३ इमारतीच्या विजेसाठी वापर केला जातो. मुंबईनंतर पुण्यातील एसटी कार्यालयाच्या इमारतीवर हा प्रकल्प राबविला आहे. यानंतर, इतर डेपो आणि जिल्हा पातळीवरील इमारतीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.