महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाची मान झुकू देणार नाही; चुरूच्या सभेत मोदींचे वक्तव्य - solider

पंतप्रधान मोदी यांनी स्थानिकांना अभिवादन करत आजच्या सभेची सुरुवात केली. मोदी पुढे म्हणाले, मी तुमचा हा उत्साह समजू शकतो. देशाच्या पराक्रमी वीरांना नमन करण्याची ही संधीच आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नरेंद्र मोदी

By

Published : Feb 26, 2019, 7:43 PM IST

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानातील बालाकोटमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'देश सुरक्षित हातांमध्ये आहे, हा विश्वास मी देशातील तमाम जनतेला देऊ इच्छितो, असे सांगत, माझं वचन आहे, की देशाची मान झुकू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. ते राजस्थान येथील चुरू येथे आयोजित सभेत बोलत होते.

देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत, यामध्ये चुरू आणि राजस्थानातील ५० लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असून, रस्ते, वीज यासह विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्थानिकांना अभिवादन करत आजच्या सभेची सुरुवात केली. मोदी पुढे म्हणाले, मी तुमचा हा उत्साह समजू शकतो. देशाच्या पराक्रमी वीरांना नमन करण्याची ही संधीच आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोदी म्हणाले, मी बाबा गोरखनाथ यांची भूमी गोरखपूरमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे उद्घाटन केले आणि लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता पोहोचला. यावेळी त्यांनी राजस्थानमधील गहलोत सरकारवर आरोप केले. राजस्थानमधील एकही शेतकऱ्याला अद्याप या योजनेचा लाभ झालेला नाही. याचे कारण म्हणजे राजस्थानच्या काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांची यादीच पाठवलेली नाही. शेतकऱ्यांच्या हिताची ही योजना अडवण्याचे काम करू नये, अशी मी काँग्रेसच्या सरकारला विनंती करतो. ही माझी ताकद नसून ही तुमची ताकद आहे. तुम्ही मला मताच्या आधारे निवडून दिले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details