मुंबई - मोदी सरकारने देशात पहिल्यांदाच कॅगच्या अहवालाचा 'वापर' स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी केला आहे. राफेल खरेदीच्या वेळी जे वित्त विभागाचे सचिव होते, त्यांचा अर्थातच व्यवहारात सहभाग होता. त्यांनीच हा कॅगचा अहवाल तयार केला असल्याने यातून मोदी यांनी आपला बचाव करून घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज केला.
मोदी सरकारने क्लिनचिटसाठी कॅगचा वापर केला-जयंत पाटील
'राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल, तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय,' असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 'कॅगने एखाद्या मंत्र्याचे किंवा खात्याचे कौतुक केले आहे, असे आजपर्यंत कधीच घडले नाही,' असे ते म्हणाले.
'कॅग अहवालाबाबत बोलायचे तर, आतापर्यंत राज्यात आणि देशातही सर्वांनीच कॅगचे अनेक अहवाल बघितले आहेत. पण पहिल्यांदाच कॅगच्या अहवालामध्ये एखाद्या विभागाचे असे कौतुक करताना पाहिले आहे. सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेणे व त्यात काही आक्षेपार्ह असेल, भ्रष्टाचार असेल तर ते समोर आणणे, हे कॅगचे काम असते,' असे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संगितले.
आजपर्यंत कॅगने चांगले काम झाल्याचे सांगितलेले नाही, असेही ते म्हणाले. 'राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल, तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय,' असा सवाल त्यांनी केला. 'कॅगने एखाद्या मंत्र्याचे किंवा खात्याचे कौतुक केले आहे, असे आजपर्यंत कधीच घडले नाही,' असे ते म्हणाले. मोदी सरकार सर्व स्वायत्त यंत्रणांचा 'उपयोग' करून घेत आहे, असा आरोप पाटील केला.