मुंबई- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर सर्वच उमेदवार कामाला लागले आहेत. मुंबईमध्ये चौथ्या आणि शेवटच्या टप्यात मतदान होत असून गुढीपाडव्यानिमित्त सर्वच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ईशान्य मुंबईमधील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनीही शोभायात्रेत सहभाग नोंदवत मतदारांशी संवाद साधला.
शोभायात्रेच्या माध्यमातून मनोज कोटक यांनी साधला मतदारांशी संवाद - लोकसभा
कोटक यांनी गुढीपाडव्यानिमित्त आपल्या मतदार संघातील मानखुर्द, गोवंडी, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आदी विविध ठिकाणी भेटी देऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला.
कोटक यांनी गुढीपाडव्यानिमित्त आपल्या मतदार संघातील मानखुर्द, गोवंडी, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आदी विविध ठिकाणी भेटी देऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला. मतदारांचे आणि वयोवृद्धांचे आशीर्वाद घेत कोटक यांनी आपल्या खांद्यावर पालखी घेतली. तसेच त्यांनी लेझीम देखील खेळले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार किरीट सोमय्या आणि भाजपचे नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी मतदारसंघातील जेष्ठ नागरिक, महिला मंडळ, सामाजिक संस्थामधील कार्यकर्त्यांच्या भेटीवर जोर दिला आहे.
सर्वच उमेदवार मोर्चेबांधणी करत आहेत. मतदारांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातच एखादा सणाच्या मुहुर्तावर मतदार मोठ्या संख्येने हजर असतात. अशा ठिकाणी उपस्थित राहून मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जाते. मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त अनेक शोभायात्रा निघाल्या. या शोभायात्रांमध्ये मुंबईमधील बहुतेक उमेदवारांनी सहभाग नोंदवला.