मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी होती. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नाराजी दूर केली असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याप्रसंगी नाराज झालेले काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचा व्हिडिओही काँग्रेसने प्रसारित करत यामध्येही कोणीही नाराज नसल्याचे दाखविण्यात आले आहे.
मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेस नेत्यांची नाराजी केली दूर? - काँग्रेस
बैठकीत मल्लिकार्जुन खरगे केसी वेणूगोपाल आणि मधुसूदन मिस्त्री यांनी चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही समजूत काढली आहे. किमान लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे मत विचारात घेत नाहीत. आपलेच म्हणणे पुढे रेटत असतात, अशा अनेक तक्रारी काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीकडे पोहोचल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून खरगे यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक असलेले मधुसूदन तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी वेणूगोपाल हे मुंबईत आले होते. त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेवून त्यावर तोडगा काढला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील आठवड्यातच मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अचानक बदलल्याने काँग्रेसच्या निरुपम विरोधी गोटात उत्साहाचे वातावरण आहे. निरुपम आणि इतर गट मात्र काँग्रेसच्या या निर्णयावर नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनीही अनेक चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप करत मागील काही दिवसात काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. आपले कोणी ऐकत नाही, त्यामुळे आपण काँग्रेस सोडून देवू, अशा प्रकारचे वक्तव्य मागील काही दिवसात अशोक चव्हाण यांनी केले होते. या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे केसी वेणूगोपाल आणि मधुसूदन मिस्त्री यांनी चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही समजूत काढली आहे. किमान लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.