कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सत्ताकारणाच्या नाटका दरम्यानच आज बेळगावच्या सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर आणि समितीचे पदधिकारी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत बैठक केली. बेळगावाचा सीमा प्रश्न मार्गी लागावा, अशी इच्छा खुर्द बाळासाहेब ठाकरे यांची होती. म्हणून एकीकरण समितीने आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे आणि लवकरच महाराष्ट्र एकीकरण समितीचे उच्च स्तरीय शिष्टमंडळ घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
बेळगाव सीमा प्रश्नासाठी उद्धव ठाकरेच्या उपस्थितीत म.ए.समिती घेणार पंतप्रधानांची भेट... - Belgaum border issue
बेळगाव सीमा प्रश्न मार्गी लागावा यासाठी एकीकरण समितीच्या वतीने उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. उच्च स्तरीय शिष्टमंडळ घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.
म.ए.समिती घेणार पंतप्रधानांची भेट
यावेळी बैठकीत कानडी सत्तेचं राजकारण वाढत चाललंय. त्याबद्दल आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा प्रश्न प्रलंबित आहे त्याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली.
त्यांनतर आज समिती, मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे व लवकरात लवकर प्रश्न कसे मार्गी लावता येतील यावर त्यांच्याकडे चर्चा करणार आहोत, असे किरण ठाकुर यांनी सांगितले.