मुंबई - गेल्या आठवाड्यापासून कर्नाटकातील राजकीय अस्थिरता कायम असून बंडखोर आमदार अजूनही मुंबईत आहेत. त्यांचे मन वळवण्यासाठी मुंबईत पोहोचलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनाही भेटण्यास बंडखोर आमदारांनी नकार दिला आहे.
कर्नाटक राजकीय नाट्य मुंबईत सुरूच, बंडखोर आमदारांचा शिवकुमार यांना विरोध - karnataka political crisis
बंडखोर आमदारांनी आणि मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकचे जेडीयू आणि काँग्रेस आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. दरम्यान माझे मित्र सध्या मुंबईत असल्याने त्यांना भेटायला मी आलो आहे, त्यांची भेट घेणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेलच्या प्रवेश द्वारावरच रोखले.
आज सकाळपासूनच बंडखोर आमदार तळ ठोकून असलेल्या हॉटेल रेनायसेन्समध्ये गडबड सुरू आहे. बंडखोर आमदारांनीही आम्हाला शिवकुमार यांना भेटायचे नाही, त्यांच्यापासून आम्हाला धोका असल्याचे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉटेल परिसरात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
बंडखोर आमदारांनी आणि मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकचे जेडीयू आणि काँग्रेस आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. दरम्यान, माझे मित्र सध्या मुंबईत असल्याने त्यांना भेटायला मी आलो आहे, त्यांची भेट घेणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेलच्या प्रवेश द्वारावरच रोखले.