एखाद्या अभिनेत्याला राजकारणातील काही कळत असेल तरच त्याने त्यावर मतप्रदर्शन करावे.मात्र जर त्याबद्दल खरच काही कळत नसेल तर फक्त चर्चेत राहण्यासाठी किंवा सोशल मीडियावर ट्रेंडीग राहण्यासाठी मतप्रदर्शन करू नये असेअसं मत अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केले.'रोमियो अकबर व्होल्टर' या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात जॉन बोलत होता.
राजकारणातील काही कळत असेल तरच त्यावर बोलावं - जॉन अब्राहम
'रोमियो अकबर व्होल्टर' या सिनेमाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती राजकीयदृष्ट्या समंजस असल्याने हा विषय आम्ही कोणत्याही देश धर्म भाषा आणि पंथाच्या विरोधात जाऊन मांडला नसल्याचे जॉन अब्राहम याने नमूद केले.
नुकतंच रणवीर सिंग, आलिया भट आणि रणबीर कपूरने कोणत्याही राजकीय विषयावर आपलं मत व्यक्त करायला नकार दिला होता. माझ्या घरी वीज आणि पाणी येते तर मग मी राजकारणावर का बोलायला हवंअसेवक्तव्य रणबीरने केलेहोते. याबाबत माणिकर्णिकाच्या सक्सेस पार्टीला कंगना रणावतला विचारलेअसता हे अत्यंत अपरिपक्वतेच लक्षण असल्याचे तिने म्हटलेहोते. कलाकाराला त्याचे राजकीय मत असण्यात काहीही गैर नसून त्याला हवं त्या विषयावर त्याने व्यक्त व्हायला हवं असं कंगणाने म्हटलं होते. आज ज्याच्या जीवावर तुम्ही मोठ्या गाड्या आणि आलिशान घर घेऊन राहता त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच न वाटणं दुर्दैवी असल्याचं मत तिने मांडलं होत.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेत्यांना राजकीय भूमिका असावी अथवा नसावी यावर चर्चा सुरू झाली आहे. याबाबत जॉनला छेडलं असता त्याने कंगनाची राजकीय विषयाबद्दल ठोस मत असल्याने ती मांडत आहे आणि त्यात गैर काही नसल्याचे म्हटले. मात्र ज्यांना बिहारपासून लंडनपर्यंत सध्या काय चाललंय याची जाण नसेल त्यांनी याबाबत गप्पच राहणं योग्य असल्याचं मत त्याने व्यक्त केले.