महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2019, 11:13 PM IST

ETV Bharat / state

पाली भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करावी - प्रा. जोगेंद्र कवाडे

बौद्ध धर्मियांची पाली भाषा प्राचीन आणि लोकप्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाली भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार करावे, अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडेंनी केली आहे.

प्रा. जोगेंद्र कवाडे

मुंबई - बनारसमध्ये हिंदू विद्यापीठ तर अलिगढमध्ये मुस्लीम विद्यापीठ आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात बौद्ध धर्मियांची लोकसंख्या लक्षात घेता पाली भाषेसाठी एक स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

प्रा. जोगेंद्र कवाडे

भाजप सरकार शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने राज्य करत आहे. तसेच बौद्ध धर्मियांची पाली भाषा प्राचीन आणि लोकप्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाली भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्मिती करावी, अशी मागणी कवाडेंनी केली आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार यावर सकारात्मक निर्णय जाहीर करेल, अशी अपेक्षा आम्हाला आहे, अशी माहिती कवाडे यांनी आज दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details