मुंबई - नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी अग्निशमन दलातील जवान लावतात. त्याच्या समस्यानिवारण्यासाठी कोणत्याही स्तरावर प्रश्न मांडावे लागल्यास त्या ठिकाणी प्रश्न मांडू तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊ असे आश्वासन एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिले.
अग्निशमन दलातील जवानांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोरही मांडू - आमदार वारीस पठाण - अग्निशमन दलातील जवानांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोरही मांडू - आमदार
मुंबई अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची भायखळा येथील मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वारिस पठाण यांनी भेट दिली.
वारीस पठाण
वारिस पठाण कर्मचाऱ्यांना भेट दिली. यावेळी ते म्हणाले, जे जवान दिवस रात्र नागरिकांचे जीव वाचवतात त्यांना गेल्या ९ वर्षात साधे गमबूट भेटत नाहीत. ते कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पैशांनी विकत घ्यावे लागतात. या कर्मचाऱ्यांना ७५० रुपये शिलाई भत्ता दिला जातो यात ५ जोडी कपडे शिवण्यास सांगण्यात येतात. आजच्या महागाईच्या दिवसात इतक्या किमतीत ५ जोडी कपडे शिवून भेटतात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.