महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रज्ञा सिंह ठाकूरला कॅन्सर नसताना जामिन कसा दिला? जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ - Dr. Lahane

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी प्रज्ञा सिंहला कॅन्सर नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, आजारपणाच्या मुद्यावर तिला जामीन कसा मंजूर करण्यात आला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने खळबळ

By

Published : Apr 25, 2019, 10:04 PM IST

Updated : Apr 26, 2019, 4:11 AM IST


ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून प्रज्ञा सिंह ठाकूरच्या बोगस आजारपणाचे बिंग फोडले आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी प्रज्ञा सिंहला कॅन्सर नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, आजारपणाच्या मुद्यावर तिला जामीन कसा मंजूर करण्यात आला? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव आणि नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरने कॅन्सर असल्याचा दावा करून एनआयए कोर्टातून जामीन मिळवला आहे. तिचा हा दावा बनावट असल्याचा खुलासा डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी केला आहे. तीला कर्करोगच नाही तर कुठलाच आजार नव्हता, असे या दोघांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या खुलाशाचा आधार घेऊन आ. आव्हाड यांनी हे ट्वीट केले आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने खळबळ

प्रज्ञा सिंहला कोणताही आजार नव्हता तर अटकेतली 9 वर्षामधील 6 वर्षे ती हॉस्पिटलमध्ये कशी राहू शकली? पोलिस, तपास यंत्रणांनी, न्यायालयाने, डॉक्टरांनी त्यावर आक्षेप का घेतला नाही. असा कुठला राजकीय दबाव होता आणि न्यायालयानेही आजारपणाचा दाखला देत तीला जामीन कसा काय दिला ? दुसरीकडे छगन भुजबळ हे वेदनांनी अस्वस्थ होते; त्यांना यकृताचा गंभीर आजार झाला होता. तरीही, क्षणाक्षणाला त्यांना त्रास दिला जात होता. उपचारांची गरज असतानाही त्यांना रुग्णालयाऐवजी तरुंगात पाठवून सरकार त्यांच्या मरणाची वाट पहात होते, असा आरोप ट्विटच्या माध्यमातून करुन, प्रज्ञा सिंह ठाकूरला एक न्याय आणि छगन भुजबळ यांना दुसरा न्याय का, याबाबत चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

Last Updated : Apr 26, 2019, 4:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details