भारत आणि पाकिस्तानदरम्यान कायम तणावाची परिस्थिती असते. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत काय प्रत्युत्तर देईल, याकडे संपूर्ण लक्ष लागले होते. आज पहाटे भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या लष्करी तळांवर बॉम्ब टाकून बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फरबाद या ३ अल्फा कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. त्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आम्ही घेवून आलोय, भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सज्जतेची माहिती.
यापूर्वी दोन्ही देशांत १९४७, १९६४, १९७१ आणि १९९९ मध्ये युद्धे झाली. यात चारही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला. सद्यस्थितीत भारतीय सैन्य जगातील सर्वशक्तीशाली पाच सैन्यांमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराची तुलना
भारतीय सैन्य - १३ लाख सैनिक
पाकिस्तान - ६ लाख सैनिक
रणगाडे -
भारत- ६४६४
पाकिस्तान- २९२४
क्षेपणास्त्रे-
भारत - भारतीय लष्कराच्या ताफ्यात सुपरसोनिक क्रूझ मिसाईल ब्रम्होस, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नाग यासारख्या अत्याधुनिक मिसाईल्सचा समावेश आहे. अग्नि ५ ही भारताची सर्वात अत्याधुनिक आणि घातक मिसाईल आहे. या इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची मारक क्षमता ५ हजार किलोमीटर आहे.
पाकिस्तान- पाकिस्ताजवळ गौरी, अबाबील, शाहीन, गझन्वी आणि बाबर यासारखी क्षेपणास्त्रे आहे. बाबरची मारक क्षमता फक्त १ हजार आहे.
रणगाडे-
भारताजवळ १६०० टँक आहे तर पाकजवळ १ हजार आहे.
भारतीय वायूदल
भारतीय वायुसेना जगातली चौथी मोठी वायुसेना आहे.
जवान -
भारतीय - १ लाख २७ हजार जवान
पाकिस्तान - ६५ हजार जवान
लढाऊ विमाने -