मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून लोकलसेवा कोलमडते. यंदा ही स्थिती उद्भवू नये यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनची तयारी केली आहे. यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर 95 पंप लावले आहेत. तर दरडी कोसळणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळी लावण्यात आली आहे.
पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास 6 ठिकाणी मध्य रेल्वेच्या रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि लोकलचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते.
पावसाळ्याला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज या सोबतच मध्य रेल्वेने त्यांच्या हद्दीतील 95 टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड, विद्याविहार,कुर्ला, सायन, भायखळा, सँडहस्ट रोड, मशीद या स्थानकाजवळ नालेसफाई रेल्वे रूळ मार्ग सफाईवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे.
मध्य रेल्वेवर 79 पंप रेल्वे व 16 पंप पालिकेकडून लावण्यात आले आहे. सीएसएमटी ते ठाणे 36 , ठाणे ते कल्याण 4, सीएसएमटी ते मानखुर्द 26, कल्याण ते कर्जत 10, दिवा ते पनवेल 3, पनवेल ते रोहा 13, कल्याण ते कसारा 6 पंप बसवले आहेत.
घाट विभागात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, यामुळे लोकलसेवा कोलमडते. याची खबरदारी म्हणून लोखंडी जाळी बसविण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळायची याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.