मुंबई- पवई आयआयटी गेट समोर एका बैलाच्या हल्ल्यात आयआयटीचा विद्यार्थी गंभीर झाल्याची घटना 13 जुलैला घडली होती. अक्षय लता असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, धडक देणाऱ्या त्या लाल बैलाला पालिका आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आयआयटीच्या विद्यार्थ्याला धडक देणाऱ्या 'त्या' बैलाला पालिकेने घेतले ताब्यात
13 जुलैला पवई आयआयटी गेट समोर एका बैलाच्या हल्ल्यात आयआयटीचा विद्यार्थी अक्षय लता गंभीर जखमी झाला होता. हल्ला करणाऱ्या या बैलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अक्षय हा आयआयटीच्या गेट समोर उभा असताना दोन बैलांची या परिसरात झुंज लागली होती. यावेळी अचानक एका बैलाने त्याला पाठीमागून जोरदार धडक देऊन उडविले. यात तो जखमी झाला होता. या घटनेमुळे पाळीव प्राण्यांना रस्त्यावर मोकाट सोडून देणाऱ्या मालकांवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली होती.
आयआयटी मार्केट गेट समोर पालिका आणि पवई पोलीस यांनी मोकाट बैलाला पकडण्यासाठी कारवाई केली. यावेळी काही प्राणी मित्रांनी या अटकेला विरोध केला. त्यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, पालिकेने धडक देणाऱ्या लाल रंगाच्या बैलाला ताब्यात घेतले असून दुसऱ्या बैलाचा शोध सुरू आहे.