महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार, राज ठाकरेंची भेट; आघाडीबाबतच्या चर्चेला उधाण - mumbai

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे आमच्यासोबत दिसत असले तरी आगामी काळात येतीलच असे नाही, असे विधान केले होते. त्यामुळे मनसे आघाडीसोबत जाईल का याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर आज अजित पवार व राज ठाकरेंच्या भेटीनंतर मनसे आघाडीसोबत जाण्याच्या चर्चेला वेग आला आहे.

राज ठाकरे

By

Published : Feb 13, 2019, 11:36 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआघाडीत यायला हवे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमुळे मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दादर येथील मनसे कार्यकर्ते विवेक जाधव यांच्या निवासस्थानी या दोघांची बैठक झाली. या भेटीत दोघांनी जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पूर्वी शिवसेना आणि मनसेच्या विरोधात भूमिका घेत असत. मात्र, त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आघाडीसोबत यावे, असे मत व्यक्त केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details