महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्ही ऐकलंत का.. सेनेचे नवीन साँग 'आय लव्ह शिवसेना..शिवसेना' - पोस्टर्स

काही वर्षांपूर्वी शिवसेनेने 'शिवसेना-शिवसेना' हे गाणे प्रसारित केले होते. आता शिवसेनेने 'आय लव्ह शिवसेना' हे नवीन गाणे प्रसारित केले आहे.

शिवसेना गाणे

By

Published : Apr 7, 2019, 3:02 PM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्ष सोशल मीडिया, पोस्टर्स, बॅनर्स आणि टीव्हीवरील अॅडव्हर्टाइझच्या माध्यमाधून प्रचार करत आहेत. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने 'शिवसेना-शिवसेना' हे गाणे प्रसारित केले होते. आता शिवसेनेने 'आय लव्ह शिवसेना' हे नवीन गाणे प्रसारित केले आहे.

शिवसेना गाणे

आय लव्ह शिवसेना गाण्यात ''मनात भरली, तनात सरली शिवसेना, आय लव्ह शिवसेना' अशा ओळी आहेत. मुंबईतील चतुर्थ श्रेणी कामगार, रिक्षाचालक, सामान्य माणूस, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ महिला पुरुष आणि मोठया प्रमाणात युवा वर्गाचा समावेश हे गाणे चित्रित करण्यासाठी करण्यात आला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर चित्रित केलेले 'आय लव्ह शिवसेना' हे गाणे आता शिवसैनिक आणि सामान्य माणसांच्या पसंतीला किती उतरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बाळासाहेब हयात असताना याआधीचे शिवसेना-शिवसेना हे गाणे लोकप्रिय ठरले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details