महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 28, 2020, 11:36 AM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यातील अडीच हजार जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीचे कामे करण्याची सक्ती

राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात शिक्षकांना निवडणुकीची (बीएलओ) कामे दिलेली नाहीत. बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील अडीच हजार शिक्षकांना ही कामे करण्याची सक्ती केली आहे. या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला आहे.

जिल्हा परिषद बुलडाणा
जिल्हा परिषद बुलडाणा

बुलडाणा -जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शिक्षकांना निवडणुकीची (बीएलओ) कामे करण्याची सक्ती जिल्हा प्रशासनकडून केली जात आहे. या आदेशाला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली जाऊ नयेत यासाठी घेण्यात आलेल्या नियोजन समितीच्या बैठकीला शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अचानक हजेरी लावली.

जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्याची सक्ती


देशपांडे यांनी बीएलओसारखी अशैक्षणिक कामे शिक्षकांना न देण्याची विनंती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी या बाबीचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा - यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? फडणवीसांचा चव्हाणांना टोला
राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात शिक्षकांना बीएलओची कामे दिलेली नाहीत. बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील अडीच हजार शिक्षकांना ही कामे करण्याची सक्ती केली आहे. जे शिक्षक बीएलओच्या कामांना विरोध करतील त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या सक्तीला शिक्षक सेनेने जोरदार विरोध केला आहे. शिक्षकांना शाळाबाह्य कामे दिल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी वाघ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details