बुलडाणा- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढलेली जन आशीर्वाद यात्रा बुलडाण्यात २९ ऑगस्टला येणार आहे. यावेळी नागरिकांसह तरुणांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील, अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी दिली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची जनआशिर्वाद यात्रा २९ ऑगस्टला बुलडाण्यात - शिवसेना
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढलेली जन आशीर्वाद यात्रा बुलडाण्यात २९ ऑगस्टला येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षात पत्रकार परिषद काल (शुक्रवार) घेण्यात आली. अकोला-बाळापूर मार्गे २९ ऑगस्टला दुपारी ३ वाजता जनआर्शिवाद यात्रा बुलडाण्यात पोहचेल. गांधीभवन परिसरात आदित्य ठाकरे उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर चिखली येथे रोड शो आणि देऊळगावराजा येथे यात्रेदरम्यान संवाद साधत औरंगाबादकडे ही यात्रा जाईल, अशी माहिती खा. जाधव यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, शांताराम दाने, माजी जिल्हाप्रमुख धिरज लिगाडे, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांची उपस्थिती होती.