बुलडाणा- कोरोनाच्या लढाईत योद्धा म्हणून पोलीस, आरोग्य, महसूल विभागासह अत्यावश्यक सेवेतील सगळेच सेवा देत आहे. अशा योद्धांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असताना बुलडाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहणा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राजेश निकाळजे, असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
धक्कादायक..! बुलडाण्यात पोलिसांच्या काठीनेच टवाळखोरांची पोलिसाला मारहाण, 3 जणांना अटक - लढा कोरोनाशी
बुलडाणा शहरात 5 कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने त्यांच्या परिसरातील 3 किलोमीटरचे परिसर पोलिसांनी सील केले आहेत. या दरम्यान सोमवारी 4 मे ला रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान बुलडाणा शहरातील कंटेंटमेंट झोनमधील टिपू सुलतान चौकात राजेश निकाळजे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा शहरात 5 कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने त्यांच्या परिसरातील 3 किलोमीटरचे परिसर पोलिसांनी सील केले आहेत. या दरम्यान सोमवारी 4 मे ला रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान बुलडाणा शहरातील कंटेंटमेंट झोनमधील टिपू सुलतान चौकात राजेश निकाळजे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी जावेद खान व त्याचे 4 सहकारी तोंडाला मास्क न लावून विनाकारण फिरत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी निकाळजे यांनी त्यांना मास्क का लावले नाहीत? असे विचारताच जावेद खान त्याच्या सहकाऱ्यांनी निकाळजेवर हल्ला केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याजवळील शासकीय काठी घेऊन त्या काठीनेच पोलिसाला मारहाण करण्यात आली.
यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीमधील एक आरोपी माजी नगरसेवकाचा भाऊ आहे.