महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधिताचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार, मुस्लिम व्यक्तिने केले अंतिम संस्कार - buldana youth corona death funeral

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका तरुणाच्य़ा घरच्यांनी त्याचा मृतदेह स्विकारण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर बुलडाण्यातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहर यांनी या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले.

mohammad azhar during funeral
अंत्यसंस्कार करताना मोहम्मद अजहर

By

Published : Sep 14, 2020, 8:47 PM IST

बुलडाणा -कोरोनाच्या या महासंकटात अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे. तर काही ठिकाणी माणूसकी लोप पावल्याचेही प्रकार समोर आले आहेत. असाच माणुसकी लोप पावल्याचा प्रकार येथे समोर आला. एका 45 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेविका यांचे पती मोहम्मद अजहर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत या रुग्णांवर अंतिम संस्कार केले.

कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह घरच्यांनी नाकारल्यावर मुस्लिम व्यक्तिने केले अंत्यसंस्कार

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातही वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांसोबत मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी डोनगाव येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सोबत या रुग्णावर अंतिम संस्कार केले.

नातेवाईकांनी नाकारलेल्या या कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला मुस्लिम समाज कार्यकर्त्याने अग्नी देत एकतेचे दर्शन घडवले. कोरोनाच्या धास्तीमुळे नातेवाईकच मृतदेह स्वीकारण्यास नकार देत असल्याने माणुसकीचा मृत्यू होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details