बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव येथील एका ३२ वर्षीय विवाहीत तरुणाने जनुना तलावात उडी घेऊन आपले जिवन संपवल्याची घटना उघडकीस आली. गोपाल गजानन देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
जनुना तलावात उडी घेऊन तरूणाने संपवले जीवन - youth committed suicide in buldhana
जिल्ह्यातील खामगाव येथील एका ३२ वर्षीय विवाहीत तरुणाने जनुना तलावात उडी घेऊन आपले जिवन संपवल्याची घटना उघडकीस आली. गोपाल गजानन देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

जनुना तलावात उडी घेऊन तरूणाने संपवले जीवन
शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृत गोपाल गजानन देशमुख हे शिवाजीवेस भागात राहत होते. घटनास्थळी पोलिसांना दोन मोबाईल हॅण्डसेट, नवीन कोल्हापुरी चप्पल आणि एक डायरीही आढळून आली आहे. तरुणाचे मृतदेह गळाच्या साहाय्याने तलावाच्या बाहेर काढण्यात आले असून, तरूणाने आत्महत्या का केली ? या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत.