बुलडाणा - बुलडाण्याच्या खामगावात सैराट चित्रपट मधील कृत्य झाल्याचे मंगळवारी रात्री समोर आले. काही महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केल्याने सतीफैल मध्ये राहणाऱ्या युवकावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी ( Knife Attack on Youth in Buldana ) करण्यात आले. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालय आणि नंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे युवकावर हा खामगावच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोरच हल्ला करण्यात आला आहे. ज्या युवकावर हल्ला करण्यात आला आहे त्याचा नाव अमन उर्फ रघु तिवारी आहे. खांमगावात झालेल्या सैराट घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पळून जावून केला होता विवाह -
सतीफैल भागातील रहिवाशी राहणाऱ्या अमन आणि एका मुलीने प्रेम प्रकरणातून पडून गेले होते. मुलीकडील नातेवाईकांनी मुलगी पळून जाण्याची तक्रार शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. दरम्यान मंगळवारी 4 जानेवारीला अमन आणि ती मुलगी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हजर होवून मर्जीने लग्न केल्याचे पोलिसांना जबाब दिला.
शिवाजी नगर पोलीस स्टेशनसमोर तरूणावर हल्ला -