महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 30, 2019, 2:28 PM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यातील येळगाव धरण 100टक्के भरले; 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

चार दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय 100 टक्के भरल्याने परिसरातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

स्वर्गीय भोंडे जलाशय

बुलडाणा - चार दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय 100 टक्के भरल्याने परिसरातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

बुलडाण्यातील येळगाव धरण 100टक्के भरले
मागील 20 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जून अखेर बरसण्यास सुरवात केली आहे. चारच दिवसात जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले स्व. भोंडे धरण 100 टक्के भरुन गेले आहे.

इतिहासात पहिल्यादाच चार दिवसाच्या पावसाने हे धरण भरले आहे. 28 जून ते 2 जुलै पर्यन्त 25 ते 50 मिली मिटर पाऊस पडण्याच्या अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांमधील नागरीकांना सतर्क राहण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details