महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yashomati Thakur on Bachchu Kadu : 'बघा..आज आमच्या जिल्ह्यातलं भूत येतंय' - यशोमती ठाकूर - संग्रामपूर नगर पंचायत निवडणुका

"बघा...आज आमच्या जिल्ह्यातलं भूत येतंय इथं...!" अस भाषणाच्या सुरुवातीलाच सांगून नाव न घेता महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur on Bachchu Kadu) यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.

Yashomati thakur
Yashomati thakur

By

Published : Dec 17, 2021, 8:59 AM IST

बुलडाणा :- "बघा...आज आमच्या जिल्ह्यातलं भूत येतंय इथं...!" अस भाषणाच्या सुरुवातीलाच सांगून नाव न घेता महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur on Bachchu Kadu) यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची एकमेकांच्या विरोधात टीका सुरू झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यशोमती ठाकूर आज गुरुवारी 16 डिसेंबर रोजी नगर पंचायतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी आल्या होत्या.

यशोमती ठाकूर यांनी केली टीका
प्रचार सभेत यशोमती ठाकूर यांनी पुढे म्हटलं की , त्या भुतांमध्ये जर तुम्ही गुरफटला तर संपलाच मग तुमचा विषय....!" आता याला बच्चू कडू काय उत्तर देतात हे पाहणे रंजक असणार आहे.
संग्रामपूरात प्रचारार्थ येणार बच्चू कडू
संग्रामपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत जनशक्ती प्रहार संघटनेकडून १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहे. त्यांच्या प्रचार सभेसाठी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू रात्री येत आहे.यशोमती ठाकूर यांनी त्यांचं नाव न घेता बघा आमच्या जिल्ह्यातलं भूत येतंय म्हणून टिका केली आहे. आत्ता प्रचार सभेत बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांना काय प्रतिउत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details