महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप आमदार फुंडकरांच्या आदर्श गावाची दयनीय अवस्था; आतापर्यंत 'भोपळा' विकास - भाजप आमदार आकाश फुंडकर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावांचा विकास झाला की नाही याचा आढावा आम्ही घेत आहोत. त्यानुसार आमदार आकाश फुंडकर यांच्या बुलडाण्यातील खेर्डा गावाचा हा आढावा.

भाजप आमदार फुंडकरांच्या आदर्श गावाची दयनीय अवस्था

By

Published : Oct 14, 2019, 1:54 PM IST

Updated : Oct 14, 2019, 8:51 PM IST

बुलडाणा -मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघातील गाव दत्तक घेऊन आदर्श ग्राम करण्याचे संकल्प केला. त्यासाठी आमदार आदर्श ग्राम योजना ही अमलात आणली. मात्र, सत्ताधारी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी आदर्श ग्राम करण्यासाठी दत्तक घेतलेल्या खेर्डा गावात शून्य विकास झालेला दिसत आहे.

भाजप आमदार फुंडकरांच्या आदर्श गावाची दयनीय अवस्था

आकाश फुंडकर हे राज्याचे कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. 2014 च्या निवडणुकीत ते आमदार झाले. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी खामगावात आले होते. पंतप्रधान यांनी आदेश देत सर्व खासदारांना आदर्श ग्राम करण्यासाठी गाव दत्तक घेण्याचे सुचविले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदारांना गाव दत्तक घेऊन आमदार आदर्श ग्राम योजनेची सुरुवात केली. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी खेर्डा हे गाव दत्तक घेतले. मात्र, या गावात आमदार आदर्श ग्राम योजनेतून शून्य रुपयांची विकास कामे केली.

हेही वाचा - 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

गावासाठी 742.50 लक्ष रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. मात्र, एक रुपयाही निधी या गावाच्या विकासाठी आणता आला नाही. गावात तीव्र पाणीटंचाई होती. टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. भाजप आमदारांच्या दत्तक गावातील तीव्र पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आजी-माजी आमदारांच्या पथकाने गावात भेट दिली. मात्र, गावात विकास कामे न झाल्याने त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा - 'राहुल गांधींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, तेवढ्या आमच्या जागा वाढतील'

पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री पेयजल 82 लाखांची योजना आणली गेली, तरी 8 ते 10 दिवसाआड पाणी येतो. या व्यतिरिक्त गावाला अनेक समस्याने ग्रासले आहे. गावात नाल्या नाही, रस्ते नाही, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावात विद्युत खांब वाकलेल्या अवस्थेत असून गावातील विद्युत डीपीच्या तारा उघड्या पडलेल्या अवस्थेत आहे. कित्येक वेळा ग्रामस्थांकडून तक्रारी करून खुल्या तारेंची व्यवस्था केली जात नाही. इतकेच नव्हे, तर ज्या ठिकाणी युवकांना शरीर सुदृढ बनविण्यासाठी व्यायाम शाळा दिलेली आहे. त्या ठिकाणी युवक व्यायाम करत नाही. त्या ठिकाणी खेर्डा गावाची ग्रामपंचायत कार्यालय म्हणून सुरू आहे.

हेही वाचा - बुलडाण्यातील जांबुवंती नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू, शहरात हळहळ

गावात 3 ते 4 कोटी रुपयांचे कामे केल्याचा दावा केल्या जात आहे. रस्ते, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. मात्र, ते निकृष्ट दर्जाचे केल्याने सरपंचांनी त्याची तक्रार करून ते अद्यापपर्यंत ग्रामपंचायतने आपल्या ताब्यात घेतले नाही. भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी दत्तक घेतलेल्या आदर्श ग्रामची ही अवस्था असेल, तर बाकी मतदारसंघाचा काय अवस्था असेल? याचा विचार न केलेलाच बरा.

हेही वाचा - संग्रामपूर तालुक्यात चोरट्यांचा कृषी केंद्रावर दरोडा

Last Updated : Oct 14, 2019, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details