बुलडाणा - कुणाची परिस्थिती कशी आणि केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविणाऱ्या बबिता ताडे यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या बळावर 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी नोंदवला. त्यांनी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकले.
विदर्भाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या बबिता ताडे यांनी काम आणि कौटुंबिक जाबाबदारी सांभाळत असताना पुस्तकावरचे प्रेम कमी होऊ दिले नाही. वाचनाच्या आवडीमुळेच आपल्याला यश मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे लक्ष्मीनारायण ग्रुपने आयोजित केलेल्या 'माणिनी' या कार्यक्रमासाठी बबिता ताडे आल्या होत्या.