बुलडाणा - गेल्या 28 दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारीत करुन शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. संपूर्ण भारतातील शेतकरी महिला, पुरुष, युवक दिल्लीत येथे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज बुलडाण्यात स्थानिक जयस्तंभ चौकात महिला कॉंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा मिनलताई आंबेकर मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी-
सकाळी ११ वाजता जयस्तंभ चौक येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा मिनलताई आंबेकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा-
केंद्र शासनाने काढलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बहुतांश सामाजिक संघटना आणी राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना समर्थन देत केंद्र सरकारचा विरोध केला आहे. तरीही केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहे. केंद्र शासनाने हा शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करावा, म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत-
तसेच हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता मैदानात उतरला आहे. जोपर्यंत मोदी सरकार हे काळे कायदे मागे घेणार नाही. तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणी अंबानी व अदानी, अशा उद्योजकांना फायदा आहे, असे सांगितले आहे.
प्रधानमंत्री मोदी ज्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्या खुर्चीचे पाय अंबानी आणि अदानीचे आहेत. म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेत नसल्याचे सांगून केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा मिनलताई आंबेकर, ज्योती ढोकणे, आशा इंगळे, मंगलाताई पाटील, कमलताई गवई, वंदना टेकाळे, उषाताई लहाने, नंदा धंदर, इंदू घटटे, विद्या जुनारे, पंचफुला मापारी, मीना पाटील, अपर्णा गावंडे, स्मिता शिराळ, प्रज्ञा चौधरी, संगिता धोरण, ज्योती धोरण, नेहल देशमुख, मिना सानप, शिवानी देशमुख, ज्योत्स्ना जाधव, बनोबी चौधरी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे विजय अंभोरे, संजय राठोड, लक्ष्मणराव घुमरे, डॉ.संतोष आंबेकर यांच्या जिल्हा भरातील कॉंग्रेस पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा-खराब वातावरणामुळे जवानाचे पार्थिव गावी येण्यास उशीर; जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांची माहिती