बुलडाणा -सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे छोट्या नालेही ओसंडून वाहत आहेत. अशाच जिल्ह्यातील एकानाल्याला पूर आले असतांना यातून मार्ग काढत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणारी एक महिला पूरात वाहून जाता जाता थोडक्यात बचावली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदत करून या महिलेचे प्राण वाचवले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील चिचपुर येथे घडली आहे.
दोरीच्या साहायाने नागरिक ओलांडत होते रस्ता
बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. उंद्री, वैरागड, चिंचपूर या परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच नदी-नाल्यांना पूर आला होता. या दरम्यान चिंचपूर येथे गावानजीक असलेल्या नाल्याला मोठा पूर आला असतांना स्थानिक नागरिक या पाण्यातून दोरी बांधून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यातच एक महिला पूरातून रस्ता ओलांडत असतांना तिचा तोल गेल्याने वाहून जात असतानाच स्थानिक नागरिक तिच्या मदतीला धावत या महिलेचे प्राण वाचवले आहेत.
नवीन पूल बांधण्याची मागणी
चिंचपूर गावानजीक लहान पूल असल्याने साधारण पाऊस झाला तरी या नाल्याला पूर येतो. परिणामी अनेक गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून याठिकाणी मोठा पूल बांधण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा -जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, बहीरवली, सुसेरी यासह खाडीपट्टयातील १५ गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प