बुलडाणा: अमडापूर रोडवरील पेठ शिवारात ११ डिसेंबर रोजी प्रशांत अशोक वाकीकर (रा.खामगाव) यांच्या उभ्या स्विफ्ट डिझायर कारचे काच फोडून (window of a parked car broken) चाकूचा धाक दाखवून (robbed on knife point) एक मोबाईल व २५०० रुपये हिसकावून ५ आरोपी पळून गेले होते. याबाबत फिर्यादींनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. (Buldana Crime) दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीच्या आधारे पाचही आरोपींना गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहन व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात (LCB team arrested 5 accused) आले आहे. (Latest news from Buldana)
Robbery In Buldana : उभ्या कारची काच फोडून लुटले; ५ आरोपींना एलसीबी पथकाने ठोकल्या बेड्या - कारच्या काचा फोडणे
अमडापूर पोलीस ठाणे अंतर्गत रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट डिझायर कारचे काच फोडून (window of a parked car broken), चाकूचा धाक दाखवून मोबाईल सह रोख रक्कम लांबविणाऱ्या (robbed on knife point) ५ आरोपींना बुलडाणा एलसीबी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीच्या आधारे पाचही आरोपींना गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहन व मुद्देमालासह ताब्यात (LCB team arrested 5 accused) घेण्यात आले आहे. (Latest news from Buldana)
या आरोपींना ठोकल्या बेड्या :सतीश शंकर गायकवाड (वय २८) वर्ष रा. सवासणी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, परसराम सिद्धू जाधव (वय २५) रा. सवासणी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, वैभव गजानन गावंडे (वय २१) रा. भराडखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना, कृष्णा भगवान भोपळे (वय२२) रा. सोनगिरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, गजानन रामप्रसाद प्रसाने (वय २१) रा. डोलखेड तालुका जाफराबाद जिल्हा जालना असे आरोपींची नावे आहेत.
या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई : ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांच्या आदेशानुसार सपोनि अमित वानखेडे,सपोनि मनिष गावंडे, सपोनि विलासकुमार सानप, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, पोहेका सुधाकर काळे,पोना सुनील खरात,दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरताळे, वैभव मगर, सचिन जाधव, मधुकर रगड यांनी केली.