बुलडाणा - राज्यात कोरोनाच्या युद्धात योद्धा म्हणून आपले कर्तव्य पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार महसूल प्रशासनासोबत अत्यावश्यक सेवेत कामगिरी पार पाडत आहे. सोमवारी कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोना वॉरियरचे बुलडाण्यात पुष्पवृष्टी करून जंगी सत्कार करण्यात आले.
बुलडाण्यात कोरोना योद्धा परिचारिकेचे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत - बुलडाणा ग्रीन झोनकडे
वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या व कोवीड-१९ रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिका यांनी आपली सेवा देण्यासाठी रुग्णालयात 14 दिवसाचे क्वारंटाईन करून घेतले होते. ही सेवा पूर्ण केल्यानंतर त्या घरी परतल्या. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी विष्णुवाडी भागातील नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या व कोवीड-१९ रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिका चित्रा जोशी या आपली सेवा देण्यासाठी रुग्णालयात 14 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण करून सेवा केल्यानंतर त्या घरी परतल्या. यावेळी त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी विष्णुवाडी भागातील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
बुलडाणा जिल्ह्यात २४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कोव्हीड रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांच्या अथक प्रयत्न करत आहेत. सोमवारपर्यंत यातील २० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर, उर्वरित 3 रुग्णांवर उपचार सुरू आहे. हे तीनजण कोरोनामुक्त झाल्यास बुलडाणा जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये जाऊ शकतो आणि यासाठी आरोग्य विभाग अथक प्रयत्न करताहेत. कोरोनाशी युद्ध लढतांना फिरत्या चक्राने आरोग्य विभागातील ५० परिचारिका, डॉक्टर हे कोव्हीड रुग्णालयामध्ये १४ दिवस त्याच ठिकाणी क्वारंटाईन राहुन आपली सेवा देत आहेत. परिचारिका चित्रा जोशी या १४ दिवसांची सेवा दिल्यानंतर घरी पोहोचल्या. यावेळी त्यांचे विष्णुवाडी परिसरातील नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले.