महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lok Sabha Election: बुलडाणा लोकसभा मतदारसंघात ६२.५० टक्के मतदान - ncp

बुलडाणा मतदारसंघात १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. उन्हाचा पारा वाढण्यापुर्वी मतदारांनी मतदान करण्यावर भर दिला.

मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

By

Published : Apr 18, 2019, 7:35 AM IST

Updated : Apr 18, 2019, 7:05 PM IST

बुलडाणा- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघांमध्ये आज मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी ३ उमेदवारांमध्ये खरी लढत असणार आहे. विदर्भात तापमान जास्त असल्याने मतदारांनी उन्हाचा पारा वाढण्यापुर्वीच मतदान करण्याला प्राधान्य दिले आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आज मतदान

बुलडाण्यामध्ये मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. येथील 102 वर्षीय वृद्ध वामन भैरव पांडे यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय मतदान केंद्रावर आपले मतदान केले आहे. त्यांनी वयाच्या 102 व्या वर्षी मतदान केल्याने नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने वामन पांडे यांचा मतदान केल्याचे ट्वीट केले आहे.

मतदान करताना वामन पांडे

Live Updates -

  • बुलडाणा मतदार संघात अंदाजे ६२.५० टक्के मतदान झाले.
  • ०३.०० Pm - दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.९४ टक्के मतदान झाले
  • 01.00 am - दुपारी १ वाजेपर्यंत ३४.४३ टक्के मतदान
  • 12.00 am - दुपारी १२ वाजेपर्यंत बुलडाणा मतदारसंघात २०.४९ टक्के मतदान
  • 12.00 am - उत्साही नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
  • 11.30 am - बुलडाणा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २०.५४ टक्के मतदान.
  • 11.00 am - काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले मतदान.
  • 09.00 am - बुलडाणा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.७० टक्के मतदान.
  • 9.45 am - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क
  • 07.00am - सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यात मतानाला सुरूवात.
    वामन पांडे
Last Updated : Apr 18, 2019, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details