बुलडाणा - बुलडाणा लोकसभा मतदारसंघात झालेली मतदान संख्या व मतदान मोजणी संख्या यामध्ये तफावत आढल्याचे समोर आले आहे. मोजलेल्या मतांमध्ये 583 मतांची तफावत असल्याने साशंकता निर्माण झाली असून अद्यापपर्यंत कुठल्याही उमेदवाराने यावर हरकत नोंदवलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान झाले होते. निवडणुकीत झालेल्या मतमोजणीदरम्यान समोर आलेली मतांची बेरीज आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यात फरक असून मतमोजणीतील मते अधिक आहेत. या निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे, वंचित बहुजन आघाडीचे बळीराम शिरस्कार यांच्यासह ऐकून 12 उमेदवार निवडणूक रिगणात होते. 23 मे च्या मतं मोजणी रोजी युतीकडून शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे बळीराम शिरस्कार यांना मिळालेली मते निर्णायक ठरली.
येथे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी 5, लाख 21 हजार 977 मते मिळवून तब्बल 1 लाख 33 हजार 387 मतांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. तर डॉ.राजेंद्र शिंगणे यांना 3 लाख 88 हजार 690 मते, वंचित बहुजन आघाडीचे बळीराम शिरस्कार यांना 1 लाख 72 हजार 627 मते प्राप्त झाली. 18 एप्रिल रोजी येथे 11 लाख 18 हजार 486 मतदारांनी आपले मतदान केले. 63.53 टक्के मतदान झाले.
22- बुलडाणा विधानसभा मतदारसंघ – झालेले मतदान - पुरूष मतदार 89 हजार 747, स्त्री मतदार 78 हजार 523, एकूण 1 लक्ष 68 हजार 270,
23-चिखली विधानसभा मतदारसंघ –झालेले मतदान - पुरूष मतदार 97 हजार 306, स्त्री मतदार 86 हजार 121, एकूण 1 लक्ष 83 हजार 427, टक्केवारी
24- सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ –झालेले मतदान - पुरूष मतदार 1 लक्ष 5 हजार 624, स्त्री मतदार 91 हजार 937, एकूण 1 लक्ष 97 हजार 561,
25- मेहकर विधानसभा मतदारसंघ – झालेले मतदान - पुरूष मतदार 1 लक्ष 236, स्त्री मतदार 87 हजार 1, एकूण 1 लक्ष 87 हजार 237,
26- खामगांव विधानसभा मतदारसंघ – झालेले मतदान - पुरूष मतदार 1 लक्ष 2 हजार 664, स्त्री मतदार 85 हजार 946, तृतीयपंथी 1, एकूण 1 लक्ष 88 हजार 611,
27- जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ – झालेले मतदान - पुरूष मतदार 1 लक्ष 5 हजार 205, स्त्री मतदार 87 हजार 175, एकूण 1 लक्ष 92 हजार 380 असे बुलडाणा मतदारसंघात 11 लक्ष 17 हजार 486 मतदारांनी 63.53 टक्के मतदान केल्याची माहिती प्रशासनाकडून दिली गेली होती. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये मोजणी झालेले मतदान-
22- बुलडाणा विधानसभा मतदारसंघ – 1 लक्ष 68 हजार 418,23
चिखली विधानसभा मतदारसंघ- 1 लक्ष 83 हजार 534,24
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ –1 लक्ष 97 हजार 578,25
मेहकर विधानसभा मतदारसंघ –1 लक्ष 87 हजार 217,26
खामगांव विधानसभा मतदारसंघ –1 लक्ष 88 हजार 619,27
जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ – 1 लक्ष 92 हजार 703
असे एकून 11 लाख 18 हजार 69 मतांची मोजणी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
वास्तविक पाहता 18 एप्रिल रोजी 11 लाख 18 हजार 486 मतदान झाल्याची माहिती बुलडाणा प्रशासनाकडून देण्यात आली होती. तर मोजणीत 583 मतांची तफावत येत असूनही मते मोजणीत कुठून आली. याबाबत उपजिल्हाधिकारी तथा उप निवडणूक निर्णय अधिकरी गौरी सावंत यांना विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर न बोलता 17 सी फॉर्ममध्ये आकडेवारीमध्ये तफावत असून चुकीचे आकडे लिहिले असावेत, असे सांगितले. झालेल्या व मोजणीत आलेल्या 583 मतांबाबत बुलडाणा मतदारसंघात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर 3 हजार 82 पोस्टल मते वेगळी मोजली गेली आहेत.
उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे -
1) अब्दुल हफीज अब्दुल अजीज (बहुजन समाज पार्टी, 6565) ,
2) प्रतापराव जाधव ( शिवसेना, 5,21,977)
3) डॉ.राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी,3,88,690) ,
4) प्रताप पंढरीनाथ पाटील ( बहुजन मुक्ती पार्टी, 4307),
5) बळीराम भगवान सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी, 172627),
6) अनंता दत्ता पुरी ( अपक्ष 1895),
7)गजानन उत्तम शांताबाई (अपक्ष, 1264),
8) दिनकर तुकाराम संबारे ( अपक्ष, 4162 ),
9) प्रवीण श्रीराम मोरे (अपक्ष 2245),
10) वामनराव गणपतराव आखरे ( अपक्ष, 1853),
11) भाई विकास प्रकाश नांदवे (अपक्ष, 4117),
12) विजय बनवारीलालजी मसानी (अपक्ष, 2976)