महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात 3 हजार 891 ग्रामपंचायतीच्या जागेसाठी मतदानाला सुरुवात - BULDANA LATEST NEWS

बुलडाणा जिल्ह्यात सकाळी 9:30 पर्यंत 10.23 टक्के मतदान म्हणजे 99 हजार 265 मतदारांनी आपले हक्क बजवले असून यंदा आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सुशिक्षित उमेदवाराकडे मतदाराला कल पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 1803 मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया करण्यात येत आहे.

बुलडाण्यात मतदानाला सुरुवात
बुलडाण्यात मतदानाला सुरुवात

By

Published : Jan 15, 2021, 2:15 PM IST

बुलडाणा - बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगांवराजा, शेगाव, खामगाव, नांदुरा, संग्रामपुर, जळगाव जामोद, मलकापुर आणि मोताळा या 13 तालुक्यातील 498 ग्रामपंचायतीतील 3 हजार 891 जागेसाठी मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळी 9:30 पर्यंत 10.23 टक्के मतदान म्हणजे 99 हजार 265 मतदारांनी आपले हक्क बजवले असून यंदा आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सुशिक्षित उमेदवाराकडे मतदाराला कल पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 1803 मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया करण्यात येत आहे.

बुलडाण्यात मतदानाला सुरुवात
जिल्ह्यात 527 ग्रामपंचायत पैकी 498 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवारी सकाळी 7:30 पासूनच मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी रांगा पाहायला मिळाल्या आहे. मतदान करताना ओळखीच्या पुराव्यानुसार मतदान करण्यात येते आहे. तर निवडणूक विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना मतदान केंद्रावर करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदाराला मास्क आणि सामाजिक अंतरा राखण्याची सक्ती करण्यात येत आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हाभर 1 हजार 803 मतदान केंद्र असून याठिकाणी 2 हजार 171 मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय 2 हजार 516 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. राखीव मतदान पथकांची संख्या 300 असून मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 6 हजार 916 आहे. तसेच मतदान केंद्रावर 2 हजार 29 शिपायांची सुद्‌धा नेमणूक करण्यात आली आहे.जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारीजिल्ह्यात एकूण नऊ लाख 70 हजार 671 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात चार लाख 86 हजार 010 स्त्री मतदार तर चार लाख 84 हजार 661 पुरूष मतदार आहेत. या मतदानात सर्वात जास्त खामगांव तालुक्यात 67 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सुशिक्षित उमेदवाराकडे कलयंदा जो आपल्या गावाचा विकास करू शकतो त्या सुशिक्षित उमेदवाराकडे मतदारांचा कल पाहायला मिळत आहे. बुलडाण्यापासून काही अंतरावर असलेल्या सागवान ग्रामपंचायत निवडणुकीत काही युवा वर्ग व गावकरीची प्रतिक्रिया जाणून घेतल्यास त्यांनी सुशिक्षित उमेदवाराला आपल्या मतदानातून प्राधान्य दिल्याचे म्हटले आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीमुळेच गावांचा, शहराचा व देशाचा भविष्य असल्याचे सांगत तरुणांनी ग्रामपंचायत निवणुकीला प्राधान्य देण्याचे आव्हान सागवन येथील तरुणींनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details